सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण (nirop samarambh bhashan in Marathi)Farewell speech on retirement in marathi for company employee 

आदरणीय अतिथी माझे सहकारी व सर्व मित्रमंडळींना नमस्कार. आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्वांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. 


XYZ या कंपनीत जवळपास दहा वर्षे कार्य करून मी तुम्हा सर्वांसोबत माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले क्षण घालवले आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी प्रत्येक कार्यात मला साथ देत माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले. आज आपली ही कंपनी उच्च आणि लाभदायक स्थितीमध्ये आहे आणि तुम्हा सर्वामुळे व्यवस्थापित आहे. म्हणून आज मलाही वाटत आहे की मला सेवानिवृत्त होण्यासाठी ही वेळ योग्य आहे. आता अन्य तरुण मंडळी तसेच मेहनती सहकाऱ्यांनी पुढे येऊन या कंपनीचे कामकाज सांभाळायला हवे. 


तुम्हा सर्वांसोबत घालवलेल्या कार्यकाळात मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. या गोष्टींनी माझ्या व्यावसायिक तसेच खाजगी जीवनात खूप मदत केली. आपल्या या कंपनीत माझे भरपूर मित्र बनलेत ज्यांनी वेळोवेळी माझी सहायता केली. या सर्व मित्रमंडळी कडून मी वेळेचे महत्त्व, इमानदारी, कामाचे कौशल्य आणि टीम वर्क सारख्या अनेक गोष्टी शिकलो. आम्ही सर्वांनी टीम वर्क मध्ये कार्य करूनच कंपनीला आजचे हे यश मिळवून दिले आहे. आम्हा सर्वांच्या समर्पण आणि प्रेरणेमुळेच कंपनीला खूप सारे पुरस्कार मिळाले आहेत.


माझे एकच स्वप्न आहे की आपली ही कंपनी दिवसेंदिवस यश मिळवित राहो. XYZ कंपनीला आपले सर्व कर्मचारी आणि ग्राहकांवर गर्व आहे. 


मी तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि इच्छा करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनात यश प्राप्त करो. कंपनीतील तरुण मंडळींना भविष्यात शिकण्यासाठी खूप काही आहे. म्हणून आपले लक्ष नेहमी कामावर केंद्रित असू द्या. भविष्यात तुम्ही नक्कीच यश प्राप्त करणार... धन्यवाद!


सहकर्मीसाठी निरोप समारंभ भाषण | Retirement speech in Marathi

सर्वांना शुभ संध्याकाळ. जसे की आपण सर्व जाणून आहोत आपण येथे मि. मनोहर यांच्या निरोप समारंभासाठी एकत्रित आलेलो आहोत. मिस्टर मनोहर हे माझ्या सर्वात चांगल्या सहकार्यापैकी एक आहेत, आणि ते आज विदेशात दुसरी कंपनी जॉईन करण्यासाठी आपल्याला सोडून जात आहेत. आज मनोहर यांच्या निरोप समारंभात भाषण देणे मला कठीण झाले आहे. 


आपल्या हृदयाच्या अती जवळ असलेल्या व्यक्तीला निरोप देणे सर्वात कठीण कार्य असते. मनोहर हे माझ्या अनेक वर्षांचे सोबती आहेत. आम्ही खूप सारे उपयोगी क्षण सोबत घालवले आहेत, आणि हे क्षण नेहमी माझ्या हृदयात राहतील. मिस्टर मनोहर आपले करियर आणखी योग्य बनवण्यासाठी आपल्याला सोडून विदेशात जात आहेत. जेव्हा पहिल्यांदा मी ही गोष्ट ऐकली तेव्हा मला तर माझ्या कानांवर विश्वास झाला नाही. परंतु नंतर मला विश्वास झाला की हे सत्य आहे.


माझ्या प्रिय सहकर्मी मित्रांनो, तुम्हाला विश्वास होणारा नाही जेव्हा मी पहिल्यांदा मनोहर यांच्या कंपनी सोडून जाण्याची बातमी ऐकली तेव्हा मला किती दुःख झाले. परंतु दुसरी कडे मला मनोहर यांच्या महत्वकांक्षी पणा पाहून आनंद देखील झाला. ते विदेशात जाऊन अधिक अनुभव प्राप्त करून आपले करियर नक्कीच उज्वल करतील. मला तुमचा सकारात्मक स्वभाव खूप आवडतो. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन फक्त नकारात्मक विचारांना संपवित नाही तर कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित करतो. 


तुम्ही आपल्या दूर दृष्टिकोन आणि योजनांच्या माध्यमातून कंपनीला खूप काही मिळवून दिले आहे. तुमचे कठीण परिश्रम आणि कामाविषयी ची निष्ठा खरोखर प्रशंसनीय आहे. मी तर या गोष्टीचा विचार करीत होतो की तुमच्या गेल्यावर कंपनीचे वातावरण आनंदी ठेवण्याचे कार्य कोण करील? आम्हाला प्रेरणा देण्याचे काम कोण करील? खरोखर आम्हाला तुमची खूप आठवण येईल. आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. 

निवृत्ती नंतर जेथेही जाणार,

प्रार्थना आहे आमची की आनंदी राहणार

सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

खूप खूप धन्यवाद...!

Post a Comment

Previous Post Next Post